SSC GD Bharti 2024
भारत सरकारच्या विविध विभागांमध्ये सुरक्षा दलाच्या सेवेत रुजू होण्यासाठी SSC GD Bharti 2024 ही एक महत्त्वाची भरती आहे. 2024 ची SSC GD भरती ही भारतातील विविध सुरक्षा दलांमध्ये नौकरी मिळविण्याची स्वप्न बघणाऱ्या प्रत्येक उमेदवारासाठी एक सुवर्णसंधी आहे.
कर्मचारी निवड आयोगाअंतर्गत सीमा सुरक्षा दल (BSF), केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF), केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF), इंडो- तिबेट बॉर्डर पोलीस (ITBP), आसाम रायफल्स (AR), सशस्त्र सीमा बल (SSB), सचिवालय सुरक्षा दल (SSF), नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) अशा विविध सुरक्षा दलांमध्ये SSC मार्फत GD कॉन्स्टेबल पदाच्या 39,481 जागांसाठी मेगा भरती निघालेली आहे.
SSC GD Bharti 2024 साठी कर्मचारी निवड आयोगाने पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले आहेत, संबंधित अर्ज आपण एसएससीच्या अधिकृत वेबसाइटवर 5 सप्टेंबर ते 14 ऑक्टोबर 2024 यादरम्यान करू शकता. याविषयी अधिक माहिती, एकूण पदे, ऑनलाइन अर्जाची लिंक, नोकरीचे ठिकाण इत्यादी सर्व माहिती खालील जाहिरातीत दिलेली आहे.
व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा | Join Whatsapp Group |
टेलिग्राम चैनल जॉईन करा | Join Telegram Channel |
- एकूण जागा : एकूण 39,481 पदे भरली जाणार आहेत.
- पदाचे नाव : जनरल ड्युटी (कॉन्स्टेबल).
- फोर्सनुसार तपशील : SSC GD Bharti 2024
अ. क्र. | फोर्स | एकूण पदसंख्या |
1 | सीमा सुरक्षा दल (BSF) | 15,654 |
2 | केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) | 11,541 |
3 | केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF) | 7,145 |
4 | इंडो- तिबेट बॉर्डर पोलीस (ITBP) | 3,017 |
5 | आसाम रायफल्स (AR) | 1,248 |
6 | सशस्त्र सीमा बळ (SSB) | 819 |
7 | सचिवालय सुरक्षा दल (SSF) | 35 |
8 | नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो (NCB) | 22 |
एकूण | 39,481 |
- भरती विभाग : SSC – स्टाफ सिलेक्शन कमिशन (कर्मचारी निवड आयोग) यांच्यामार्फत ही भरती घेतली जात आहे.
- भरती प्रकार : सरकारी नौकरी (गव्हर्नमेंट जॉब) मिळवण्याची ही सुवर्णसंधी आहे.
- भरती श्रेणी : केंद्र सरकार (सेंट्रल गव्हर्मेंट) द्वारे ही भरती आयोजित केली जाते.
- शैक्षणिक पात्रता : किमान 10वी पास असलेले उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात.
- शारीरिक पात्रता : SSC GD Bharti 2024
पुरुष/ महिला | प्रवर्ग | ऊंची (सेमी) | छाती (सेमी) |
पुरुष | जनरल, एससी आणि ओबीसी | 170 | 80/5 |
एसटी | 162.5 | 76/5 | |
महिला | जनरल, एससी आणि ओबीसी | 157 | N/A |
एसटी | 150 | N/A |
- वयाची अट : 01 जानेवारी 2025 रोजी 18 ते 23 वर्ष.
अनुसूचित जाती (SC) आणि अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गातील अर्जदारांसाठी 5 वर्षे सुट असणार आहे, 01 जानेवारी 2025 रोजी अर्जदाराचे वय 28 पेक्षा कमी असावे.
तसेच ओबीसी साठी 3 वर्षे सुट देण्यात आलेली आहे, म्हणजेच 01 जानेवारी 2025 रोजी अर्जदाराचे वय 26 वर्षापेक्षा कमी असणे आवश्यक आहे. - मासिक वेतन : 21,700 ते 69,100 रुपये.
- अर्जाची फी : जनरल व ओबीसी पुरुषांसाठी 100 रुपये तर अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST), महिला व माजी सैनिक (ESM) यांना अर्ज शुल्क भरण्यास सूट देण्यात आलेली आहे.
- नौकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत.
- अर्ज प्रक्रिया : अर्ज केवळ ऑनलाइन पद्धतीने एसएससीच्या अधिकृत वेबसाईटवर भरता येणार आहेत.
अर्ज करतांना उमेदवाराची नोंदणी करणे, आवश्यक ती माहिती भरणे, आवश्यक कागदपत्रे व फाईल अपलोड करून अर्जाची फी भरणे ही प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.
SSC GD Bharti 2024 : महत्वाच्या तारखा
- परीक्षेचे तात्पुरते वेळापत्रक (CBT) : जानेवारी/ फेब्रुवारी 2025 – कम्प्युटर आधारित परीक्षा.
- अर्ज करण्यास सुरुवात : 05 सप्टेंबर 2024 पासून ऑनलाईन अर्ज करण्यास सुरुवात झालेली आहे.
- ऑनलाईन अर्जाची अंतिम तारीख : 14 ऑक्टोबर 2024 हि ऑनलाईन अर्जाची शेवटची तारीख असणार आहे.
- ऑनलाईन फी भरण्याची शेवटची तारीख : ऑनलाइन फी भरण्यासाठी 15 ऑक्टोंबर 2024 शेवटची तारीख असेल.
- अर्ज दुरुस्त करण्यासाठी अंतिम तारीख : उमेदवाराचे ऑनलाइन अर्ज करताना अर्जामध्ये झालेल्या चुका दुरुस्ती 5 ते 7 नोव्हेंबर 2024 यादरम्यान करू शकतात. या तारखेव्यतिरिक्त कोणत्याही तारखेला अर्जात कसल्याही प्रकारचे बदल/ दुरुस्ती करता येणार नाहीत, महत्त्वाचे म्हणजे चुकलेले अर्ज दुरुस्ती करण्यासाठी करेक्शन चार्जेस भरावे लागेल. SSC GD Bharti 2024
SSC GD Bharti 2024 : महत्वाच्या लिंक्स
महत्वाच्या लिंक्स | |
जाहिरात (PDF) | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्जाची लिंक | ऑनलाईन अर्ज करा |
अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा |
व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा | Whatsapp Group |
टेलिग्राम चैनल जॉईन करा | Telegram Channel |
SSC GD Bharti 2024 : निवड प्रक्रिया कशी असते ?
स्टेज 1 – हि कम्प्युटर आधारित परीक्षा (CBE) असते. ही परीक्षा तुम्ही मराठी मध्ये देऊ शकता, ही परीक्षा MCQ टाईप राहते, यामध्ये एका प्रश्नाला एकूण 2 गुण असतात व 0.25 निगेटिव्ह मार्किंग असते.
क्र. | विषय | एकूण प्रश्न | एकूण गुण | वेळ |
1. | सामान्य बुद्धिमत्ता आणि तर्कशास्त्र | 20 | 40 | 60 मिनिटे |
2. | सामान्य ज्ञान आणि सामान्य जागरूकता | 20 | 40 | |
3. | प्राथमिक गणित | 20 | 40 | |
4. | इंग्लिश किंवा हिंदी | 20 | 40 | |
एकूण | 80 | 160 | 60 मिनिटे |
स्टेज 2 – शारीरिक मापदंड चाचणी (PST/ PET) :
PST – कंप्यूटर आधारित परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांना यात बोलावले जाते. यात उमेदवारांची ऊंची आणि छाती तपासली जाते. छाती 80 सेंटीमीटर पाहिजे, आणि फुगविण्याची क्षमता किमान 85 सेंटीमीटर पाहिजे.
PET – ही फिजिकल चाचणी आहे, यामध्ये रनिंग घेतली जाते.
- मुलींसाठी – 1600 मीटर – वेळ 8.5 मिनिटे
- मुलांसाठी – 5 किलोमीटर – वेळ 24 मिनिटे
3) वैद्यकीय तपासणी (मेडिकल टेस्ट)
4) कागदपत्र पडताळणी (डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन)
- अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.