Western Railway Bharti 2024 :
सरकारी नोकरीची तयारी करत असणाऱ्या अनेक तरुणांचे रेल्वेत नोकरी मिळविण्याचे स्वप्न असते, त्या सर्व तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. पश्चिम रेल्वे दरवर्षीच कित्येक तरुणांसाठी रोजगार उपलब्ध करून देत असते. दरवर्षीप्रमाणे 2024 ची पश्चिम रेल्वेमध्ये अप्रेंटिस पदासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. पश्चिम रेल्वेत एकूण 5,066 रिक्त पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे
पश्चिम रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डाने भरती संदर्भात जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे. ज्या तरुणांनी आपले शिक्षण पूर्ण केलेले आहे आणि त्यांना कामाचा अनुभव मिळवायचा असेल त्यांच्यासाठी हि एक उत्तम संधी आहे. पश्चिम रेल्वे भरती बोर्डाने सदर भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविलेले आहेत. 23 सप्टेंबर 2024 पासून ऑनलाईन अर्ज करण्यास सुरुवात झालेली असून अर्जाची शेवटची तारीख 22 ऑक्टोबर 2024 आहे.
या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, एकूण वेतन, नोकरीचे ठिकाण, वयोमर्यादा, अर्ज शुल्क, निवड प्रक्रिया आणि ऑनलाईन अर्ज प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खालील जाहिरातीत दिलेली आहे. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज करण्याआधी खालील व मूळ PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यावी. अधिक माहितीसाठी रेल्वेच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकता.
- जाहिरात क्र. : RRC/WR/03/2024
- भरतीचे विभाग : (Western Railway Recruitment Board) पश्चिम रेल्वे रीक्रूटमेंट बोर्डामार्फत ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.
- भरतीचे प्रकार : इच्छुक उमेदवारांना भारतीय रेल्वेत सरकारी नोकरी (Government Job) मिळविण्याची एक उत्तम संधी आहे.
- एकूण जागा : एकूण 5,066 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
- पदाचे नाव व तपशील :
पद क्र. | पदाचे नाव | एकूण पद संख्या |
1. | अप्रेंटिस (Apprentice) | 5,066 |
Total | 5,066 |
Western Railway Bharti : शैक्षणिक पात्रता
पदाचे नाव | आवश्यक शैक्षणिक पात्रता |
अप्रेंटिस |
|
- अर्ज पद्धती : ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे
- नोकरी ठिकाण : संपूर्ण भारतात काम करण्याची संधी
- परीक्षा कालावधी : नंतर कळविण्यात येईल
JOIN WHATSAPP GROUP | JOIN TELEGRAM CHANNEL | FOLLOW WHATSAPP CHANNEL |
Western Railway Bharti : वयाची अट
15 ते 24 वर्षे वयोगटातील इच्छुक उमेदवार यासाठी अर्ज करु शकतील.
- Minimum : 15 वर्षे
- Maximum : 24 वर्षे
Western Railway Bharti : अर्ज शुल्क
- जनरल/ ओबीसी/ इडब्ल्यूएस (EWS) : 100 रूपये
- SC/ ST/ PWD/ExSM : शुल्क नाही
- अर्ज शुल्क भरण्याची पद्धत : ऑनलाईन पेमेंट
Western Railway Bharti : महत्वाच्या तारखा
- ऑनलाईन अर्ज सुरु होण्याची तारीख : 23 सप्टेंबर 2024 पासून ऑनलाईन अर्ज करण्यास सुरुवात झालेली आहे.
- ऑनलाईन अर्जाची अंतिम तारीख : 22 ऑक्टोबर 2024 हि ऑनलाईन अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख असणार आहे.
Western Railway Bharti : महत्वाचे लिंक्स
ऑनलाईन अर्ज करा | 👉 इथे क्लिक करा |
PDF जाहिरात पाहा | 👉 इथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाइट पाहा | 👉 इथे क्लिक करा |
whatsapp ग्रुप जॉइन करा | 👉 जॉइन ग्रुप |
Western Railway Bharti : निवड प्रक्रिया
पश्चिम रेल्वे भरतीसाठी उमेदवारांची निवड प्रक्रिया पुढील टप्प्यात केली जाईल.
- Merit List
- Written Test
Western Railway Bharti : असा करा अर्ज
(खालील दिलेल्या स्टेप्स वाचून इच्छुक उमेदवार अगदी सोप्या पद्धतीने ऑनलाईन अर्ज करू शकतील.)
- अर्ज करण्यापूर्वी सर्वप्रथम पीडीएफ जाहिरात पूर्ण वाचून घ्याआणि तुम्ही पात्रता निकष पूर्ण करत असल्याची खात्री करा.
- दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि पहिल्या टॅब वर क्लिक करा.
- Click here to Aplly Online वर क्लिक करा.
- खाली Click here to Aplly Register वर क्लिक करा .
- अर्ज करताना टाकत असलेला मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी चालू असायला पाहिजे.
- तुमची सर्व माहिती व्यवस्थित भरून तुम्ही पूर्ण केलेला आयटीआय ट्रेड निवडा, आणि NEXT वर क्लिक करा.
- त्यांनंतर REGISTRATION DETAILS तपासून घ्या. Terms and conditions वर टिक करून REGISTER वर क्लिक करा. तुमचा रजिस्ट्रेशन सक्सेसफुल झालेला आहे.
- त्यानंतर CLICK HERE TO LOGIN वर क्लिक करा.
- अर्ज करताना टाकलेल्या ई-मेल आयडीवर आलेला रजिस्ट्रेशन आयडी आणि पासवर्ड टाकून Login वर क्लिक करून पासवर्ड UPDATE करा आणि नवीन पासवर्ड टाकून परत LOGIN करा.
- तुम्हाला अर्ज करायचं असलेला डिव्हिजन निवडा व SAVE वर क्लिक करा.
- हवी ती माहिती भरून घ्या, फोटो स्वाक्षरी आणि मार्कशीट सह आवश्यक असलेली कागदपत्रे UPLOAD करा.
- विहित अर्ज शुल्क भरून घ्या आणि फॉर्म SUBMIT करा.
- सबमिट केल्यानंतर अर्जाची PRINT घ्या.
- वरील जाहिरातीत सर्व मुद्दे लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे, तरीही काही माहिती अपूर्ण राहू शकते त्यामुळे एकदा मुळ PDF जाहिरात वाचून घ्यावी.